हळूहळू सूर्यही क्षितिजावर कलंडतो
मग नकळत डोळे मिटत तुझ्याच आठवणीत रमतो
मनात तुझ्याच विचारांचा कल्लोळ माजतो
पण भानावर आणत , सूर्याची शेवटची किरणही जाता जाता हाच प्रश्न विचारते
सात जन्माचं वचन देऊन जी निघून गेली , तिच्याचसाठी का तू हे अश्रू ढाळतो ???
हळूहळू आकाशात चंद्रही आपली जागा घेतो
गुलाबी थंडीत , अख्खं आसमंत बहरतो
तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण डोळ्यासमोर उभा ठाकतो
व प्रश्न विचारू पाहणाऱ्या अंधाऱ्या रात्रीला मीच उत्तर देतो
हो , मला जगणं शिकवून जी हे जग सोडून गेली , तिच्याचसाठी मी हे अश्रू ढाळतो.......!

No comments:
Post a Comment